Ticker

6/recent/ticker-posts

प्रसुतीकरीता भरती झालेल्या महीलेचा बाळासह मृत्यु



 *लाखांदुर ग्रामीण रुग्णालयातील खळबळजनक घटना वैद्यकिय अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधीचे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष ; होत आहे चौकशी मागणी                                                

 प्रतिनिधी :-  मच्छिंद्र मावळे 

ग्रामीण रुग्णालय लाखांदुर येथे प्रसुतीकरीता भरती झालेल्या महीलेचा बाळासह मृत्यु झाल्याची दुदैवी खळबळजनक दि. १९ आॅगस्तला सायंकाळचे सुमारास उघडकीस आली.    प्राप्त माहीतीनुसार प्रसुतीनंतर मृत्यु झालेल्या महीलेचे नाव सौ. रिना विवेक शहारे रा. आसोला ता. लाखांदुर (२५ वर्ष) असे असता हिला प्रसुती वेदना सुरु झाल्याने ग्रामिण रुग्णालय लाखांदुरला दि.१८ आॅगस्ट  रोज सोमवारला राञी ९.३० वाजे दरम्यान भरती करण्यात आले.तेव्हापासुन तिच्यावर योग्य उपचार न झाल्याने दि.१९ आॅगस्तच्या सकाळी ६.३० नार्मल डिलेवरी झाली व डिलेवरी नंतरही त्या नवजात शिशु व मातेवर योग्य उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यु झाला आणि मातेची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली असता तिला भंडारा जिल्हा रुग्णालय येथे रेफर चिट्टी देवुन शासकिय वाहनाने पाठविण्यात आले. माञ जात असता रस्त्यातच त्या बाळंतीन मातेचा मृत्यु झाला. या मृत्युला आरोग्य विभागच कारणीभुत आहे अशा घटना ही एकच नाही तर मागील काही वर्षापासुन वैद्यकिय अधिकारी, आरोग्य प्रशासन तथा येथील लोकप्रतिनिधीच्या निष्काळजी, कर्तव्यकसुर, पदाचा गैर वापर होत असल्याने घडत आहेत. अशी चर्चा सर्वञ तालुक्यात रंगु लागल्या असुन सदर घटनेची चौकशी व्हावी , दोषी अधिकार्‍यावर कठोर कार्यवाही व पिडीत कुटुंबाला आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी कुटुंबीयांसह सामान्य जनतेकडुन होत आहे.                                         

                          *रेफर टु भंडारा...सिलसाला केव्हा संपेल?*                                          

    लाखांदुर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य वा इतरही शासकिय रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधि यांचे पदाचा गैरवापर, कर्तव्यकसुर,दुर्लक्षतेमुळे तथा अत्याआधुनिक आरोग्य उपलब्ध होत नसल्याने रेफर टु भंडारा.. हा सिलसिला केव्हा संपेल? व तालुक्यात योग्य आरोग्य सेवा कधी मिळेल आणि नियमित होत असलेल्या दुदैवी  घटनातुन गोरगरीबांच्या जिवाशी खेळण्याचा खेळ केव्हा संपेल? असे एक ना अनेक प्रश्न तालूक्यातील जनतेच्या मनात घर करुन बसली आहेत.