Ticker

6/recent/ticker-posts

श्रीवर्धन येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी



प्रतिनिधी श्रीवर्धन संदीप लाड 

श्रीवर्धन शहर येथील संत सेना महाराज सभागृहात नाभिक समाजाच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सकाळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोथी वाचन करण्यात आली, आरती झाल्यानंतर  महाप्रसाद करण्यात आले शालेय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचां गुण गौरव करण्यात आला व संध्याकाळी भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष संदीप चाफेकर,उपाध्यक्ष अमित जाधव,सचिव अमोल कदम,सहसचिव स्वप्नील चाफेकर,खजिनदार संतोष कदम,अजय चव्हाण,प्रीतम साळुंखे,सुनील चाफेकर,अजित कदम,शंकर बुरूणकर,अनंत कदम यांच्यासह महिला मंडळाचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते