Ticker

6/recent/ticker-posts

शेगाव येथे तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय त्रेमासिक बैठक सभासद समन्वय सभा संपन्न

 


शेगाव*(ता.०३) महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना त्रैमासिक  बैठक सभासद समन्वय सभा रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र शेगाव , येथे राज्याध्यक्ष श्री नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभेस मार्गदर्शन करताना राज्यातील ग्रा.पं.अधिकारी संवर्ग यांच्या वरील अन्याय निवारणासाठी संघटना सदैव तत्पर असून संवर्गाच्या मंत्रालय स्तरावर प्रलंबीत असलेल्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन राज्यअध्यक्ष नितीन धामणे यांनी दिले. सदर बैठकीस राज्यसचिव हरिश्चंद्र काळे (अहिल्यानगर),  मधुकर मुंगल (नांदेड) महेंद्र निकम( छत्रपती संभाजी नगर)  नारायण पवार (सातारा) संजय बाविस्कर (नाशिक) आरती पाटील (नंदुरबार), विभागीय अध्यक्ष योगेश पगार ,अतुल राठोड,विलास डेंगे,जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी, गुलाब वडजे, सुनिल राजपुत,  धनंजय सस्ते ,रवींद्र ठाकरे  कुशाबा इंगळे ,लिंबाजी लांडगे, योगेश कापकर  जिल्हासचिव माया मोढे ,शशिकांत नरोडे, प्रदीप कुवर ,प्रवीण पवार ,संजय देशमुख, अनिल सूर्य यांचेसह मोठ्या संख्येने राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

 या बैठकीत पदाधिकारी व  सक्रिय सभासद यांनी विविध विषयावर चर्चा करुन महत्वपुर्ण निर्णय घेतले. संघटनेच्या मागणीनुसार शासनाने दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी केले. या निर्णयामुळे संवर्गची वेतनत्रुटी दूर झालेली असुन ११ वर्ष ते १६ वर्ष सेवा सेवा पूर्ण केलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वेतनात तफावत येत आहे ती दुर करण्यासाठी  ग्रामविकास विभागाकडे मंत्रालय मुंबई येथे पत्रव्यवहार केलेला आहे सनदशीर मार्गाने न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येईल    असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. तसेच  ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक १ जानेवारी,२०१६ पासून काल्पनिक वेतनवाढ लागू करून वेतन निश्चितीत एकसमानता येण्याकरिता शुद्धिपत्रक निर्गमित करण्याबाबत  व २ जुन २०२५ च्या शासन  निर्णयाची सांगड घालुन त्याचा फायदा संवर्गाला मिळणे बाबत पाठपुरावा सुरु असल्याचे देखील बैठकित चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन नवीन पदनामाप्रमाणे संघटनेच्या नावात *महाराष्र्ट राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटणा*  बदल तसेच  पवार - मुंगल द्वि-सदस्यीय  घटना दुरुस्ती समितीने  तयार केलेल्या घटना दुरुस्ती मसुद्यास मान्यता दिली यावेळी

ग्रामपंचायत अधिकारी संवर्गावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करणे,  अहवालचा पाठपुरावा करून शासन निर्णय निर्गमित करून संवर्गास दिलासा देणे बाबत ठराव घेण्यात आले.  संघटना कार्यकारिणीची सन २०२५-२०३० या पंचवार्षिक काळासाठी निवडणुक दि.१४ डिसेंबर २०२५ पुर्वी  सातारा येथे घेण्याचे ठरले.जुनी पेन्शन योजना लागू  करणे,.यावेळी राज्य कार्यकारिणीतील रिक्त पदावर सचिन शिंदे (सोलापूर)यांची राज्य सहकार्याध्यक्षपदी  सर्वानुमते निवड करण्यात आली  तसेच हंगामी जिल्हा कार्यकारणी वाशिम, व अकोला  यांना मान्यता देण्यात आली. नवीन निवड झालेले पदाधिकारी यांचा सन्मान करून त्यांना संघटना वाढीची जबाबदारी देण्यात आली.  सभा यशस्वीतेसाठी  वाशिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी लांडगे, जिल्हासचिव अनिल सूर्य ,कार्याध्यक्ष भागवत बुरकाडे  मोहन वानखडे व  अकोला जिल्हा कार्यकारिणीने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी अरुण इंगळे यांनी केले  राज्य कार्यकारिणीच्या परवानगीने संवर्ग हितासाठी प्रसिद्धीप्रमुख आशिष चौधरी यांनी वृत्त प्रसिद्ध केले आहे.