Ticker

6/recent/ticker-posts

ढगफुटीमुळे कवरदारी पाझर तलाव फुटला



*पाझर तलाव दुरुस्तीसाठी कवरदरी ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार यांना निवेदन*

 मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले

मालेगाव :-दिनांक 18/08/2025 रोजी सायंकाळी ढगफुटी झाली.अतिपावसामुळे सांयकाळी 5 वाजता मौजे कवरदरी ता. मालेगाव येथील पाझर तलाव फुटुन तलावातील पाणी पुर्णतः वाहुन गेले आहे. त्यामध्ये तलावाखालीच शेतजमीन खरडुन त्यामधील पिके वाहुन गेली व तसेच गावातील गुरे/जनावरे त्यामध्ये वाहुन गेल्यामुळे परिसरातील शेतकऱ्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच

 तलावातील पाणी पुर्णता वाहुन गेले कारणास्तव भविष्यात कवरदरी गावाला लवकरच पिण्याच्या पाण्याचे संकटा चा सामना करावा लागेल. या चिंतेने कवरदरी ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनात प्रशासनाद्वारे प्रत्यक्ष पाहणी करुन लवकरात लवकर तलावाचे काम पुर्ण करुन गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवुन, शेतकऱ्यांचे झालेले पिकाचे तसेच जनावर वाहून गेल्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कवरदरी ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे. तसेच निवेदनाच्या प्रतिलिपी  मा. देवेंद्रजी फडणविस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तथा मा. श्री. संजयभाऊ राठोड, जलसंधारण मृद मंत्री यांना पाठवण्यात आल्या आहे