Ticker

6/recent/ticker-posts

धनगर पिंपरी ग्रामस्थांची पाण्याची समस्या मिटली;ग्लोबल कंपेशन च्या मदतीने गावात बोरवेलचे काम पूर्ण*

 



अंबड प्रतिनिधी,

गणेश सपकाळ


अंबड:धनगर पिंपरी येथील गेल्या अनेक वर्षांपासून धनगर पिंपरी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती.ग्रामस्थांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत होती.मात्र आता ही समस्या संपुष्टात आली आहे.ग्लोबल कंपेशन या कंपनीने पुढाकार घेऊन गावात बोरवेलचे काम पूर्ण केले आहे.व बोरवेल मध्ये हातपंप बसवले ग्लोबल कंपेशन ने CSR (Corporate Social Responsibility)अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला.या बोरवेलमुळे गावातील सुमारे अंदाजे दोन ते अडीच हजार लोकसंख्या लोकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.यामुळे महिलांची पाण्यासाठी होणारी गैरसोय थांबली असून,त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

या कामाबद्दल बोलताना ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव म्हणाले,"आम्ही ग्लोबल कंपेशन कंपनीचे आभारी आहोत.त्यांनी आमच्या गावातील गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ती सोडवली.त्यांच्या या कार्यामुळे गावातील लोकांचे जीवनमान नक्कीच सुधारेल."गावकऱ्यांनी ग्लोबल कंपेशन कंपनीचे आभार मानले असून,कंपनीच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित ग्लोबलचे मस्के साहेब ग्रामविकास अधिकारी आर.ढवळे साहेब.संतोष मोढेकर.संजय जाधव.सुनील खांडेकर.कृष्णा पवार.प्रकाश ढवळे.भागीरथ खांडेकर.नंदू बोडके.महेश आरगडे.रामेश्वर मिसाळ राजू माने.गजानन आरगडे.रवि कुटे.सुमंत उपाशे  हनुमान खांडेकर.संतोष कचरे.रोहित नरोडे. ज्ञानेश्वर साळुंके बोरवेल उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..