अकोट, २ ऑगस्ट २०२५ (महाराष्ट्र ग्रामीण न्यूज): ग्रामीण भागात शेत रस्ते मोकळे करताना वारंवार वाद निर्माण होऊन हाणामारीपर्यंत मजल जाण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी पोलिस बंदोबस्ताची गरज भासत असते. आतापर्यंत यासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात खर्च उचलावा लागत होता. मात्र, आता शेतकऱ्यांना अशा प्रसंगी विनाशुल्क पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री श्री. पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यमंत्री भोयर म्हणाले की, "शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रस्ते मोकळे करणे हे शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क आहेत. त्यासाठी त्यांना कुठलाही आर्थिक बोजा नको. त्यामुळे आता कोणत्याही वादग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना पोलिसांची मदत मोफत दिली जाईल. त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत."
या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, ग्रामपातळीवरील संघर्षांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
Social Plugin