मालेगाव प्रतिनिधी: –जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : राज्य नगरविकास प्रशासन संचालनालयाच्या आदेशानुसार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी प्राप्त सूचनेनुसार “हर घर तिरंगा २०२५” ही भव्य देशभक्तीपर मोहीम मालेगाव नगरपंचायती क्षेत्रात राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी तीन टप्प्यांत कार्यक्रम आखण्यात आले असून, त्यातील पहिला टप्पा दिनांक २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपन्न झाला. या टप्प्यामध्ये मालेगाव नगरपंचायतीने विविध उपक्रम अत्यंत उत्साहाने व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून राबवले. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांमध्ये खालील उपक्रम घेण्यात आले.तिरंगा राष्ट्रध्वज रांगोळी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी जवानांसाठी राखी बनविण्याची स्पर्धा तिरंगा विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा देशभक्तिपर तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा बाईक व सायकल रॅली राष्ट्रगीत गायन व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तिरंगा ध्वजदौड व मॅरेथॉन स्पर्धा शिक्षक,विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन मालेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले.
मालेगाव येथील ना.ना.मुंदडा विद्यालयात प्राचार्य उंटवाल ,मुंदडा ,घुगे व शिक्षक-शिक्षिका वृंद,तसेच मराठी कन्या शाळा व उर्दू शाळांमध्येही नगरपंचायतीच्या समन्वयातून हे कार्यक्रम संपन्न झाले. उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नगरपंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनुने,कार्यालयीन अधीक्षक भाऊ गवळी,सिटी कोऑर्डिनेटर मारुफ मणियार, सय्यद इरफान व अन्य सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत असून, “हर घर तिरंगा” ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामनात रुजत आहे.
Social Plugin