Ticker

6/recent/ticker-posts

श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या श्रावण महिन्याची समाप्ती



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

दि २५/०८/२०२५ रोजी वार सोमवार श्री मत्स्योदरी देवी संस्थान दर सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात अभिषेक होतात.सुरुवातीला संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी देवीचा अभिषेक केला व श्रावण महिन्यात अन्य भक्तांनी सुध्दा अभिषेक व सायंकाळची आरती केली.

श्रावण महिन्याची समाप्ती दि २५/०८/२०२५ रोजी नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे यांनी अभिषेक केला.यावेळी अभिषेक करून नैवेद्य आरती केली.यावेळी अन्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी संस्थान विश्वस्त पुजारी श्री गीता विलास कुंटेफळकर,संस्थान व्यवस्थापक श्री कैलास शिंदे,संस्थान कर्मचारी नामदेव राठोड,गोविंद कायस्थ,अर्जुन शिंदे आणि दिगंबर खरात हे उपस्थित होते.