Ticker

6/recent/ticker-posts

यावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजीव बोठे यांची निवड



साकळी  ग्रामीण  प्रतिनिधी आरिफ खान 


यावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजीव बोठे यांची निवड झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घ. का. विद्यालय, आमोदा ता. यावल येथील मुख्याध्यापक असलेले संजीव बोठे यांची यावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध मान्यवरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक समाजाच्या उन्नतीसाठी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी आणि संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

संजीव बोठे यांनी सर्व सहकारी मुख्याध्यापकांचे आभार मानत, सर्वांना विश्वासात घेऊन संघटनेच्या बळकटीसाठी व शिक्षक हिताच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.