Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावात ४ जुलै रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळा; ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांना 'कार्यगौरव पुरस्कार'



डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार वितरण; 'फुलानंद उत्कृष्ट पालक पुरस्कारां'चीही घोषणा

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे  ] 

संस्कृती प्रकाशन आणि फडतरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार वितरण समारंभ येत्या शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्री सेवागिरी मंगल कार्यालय (सातारा पंढरपूर रोड, पुसेगाव) येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि गुणवंतांचा विशेष सन्मान केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


या वर्षीचा मानाचा 'कै. सतिशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार'ज्येष्ठ साहित्यिक व वक्ते प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


कै. आनंदराव बजाबा फडतरे व कै. फुलाबाई आनंदराव फडतरे यांच्या स्मरणार्थ, श्री सेवागिरी व हनुमानगिरी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विशेष सन्मान फुलानंद उत्कृष्ट पालक पुरस्कार' देऊन केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त पालकांची नावे खालीलप्रमाणे


सौ. सारिका व श्री. सुभाष बळीराम कदम(कु. श्रेया सुभाष कदम : प्रथम)

सौ. संगिता व श्री. सचिन विठ्ठल नलावडे (कु. प्रियांका सचिन नलावडे : द्वितीय)

सौ. प्रतिमा व श्री. प्रकाश निवृत्ती ठोंबरे (कु. भक्ती प्रकाश ठोंबरे : प्रथम)

सौ. सुजाता व श्री. अंकुश सर्जेराव लवंगारे(कु. सिद्धी अंकुश लवंगारे  द्वितीय)


आपल्या कर्तृत्वाने परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खालील मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष गौरव केला जाईल

जयवर्धन मदन जाधव (लेफ्टनंटपदी नियुक्ती बद्दल)

प्रज्ञा शीतलकुमार जाधव (चार्टर्ड अकाऊंटंट - CA झाल्याबद्दल)

ऐश्वर्या प्रदीप देशमुख (गटविकास अधिकारी - BDO पदी निवड झाल्याबद्दल)

 या सोहळ्याचे नेटके नियोजन निमंत्रक सुनिताराजे पवार (प्रकाशक, संस्कृती प्रकाशन), प्रा. अविनाश फडतरे (कुटुंबप्रमुख, फडतरे परिवार), श्री. सुसेन जाधव (संस्थापक, ईगल ग्रुप, पुसेगाव) आणि सेवागिरी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक व स्टाफ (पुसेगाव) यांच्या वतीने करण्यात आले. आवाहन पुसेगाव व परिसरातील साहित्यप्रेमी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने 'सस्नेह निमंत्रण' पत्रिकेद्वारे करण्यात आले आहे.