Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव येथील सार्वजनिक स्वच्छतागृह तात्काळ उभारण्याची व्यापारी व ग्रामस्थांची मागणी.



  बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव  येथील श्री सेवागिरी रयत संघटना ,ईगल ग्रुप, व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने पुसेगाव चौका नजीक सार्वजनिक स्वच्छतागृह तात्काळ उभे करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्न प्रलंबित असून सध्या या प्रश्नांमुळे प्रवासी, विद्यार्थी व व्यावसायिक लोकांची मोठी गैरसोय होत आहे.

  सदरच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपसरपंच विशाल जाधव यांच्या सोबत संवाद साधला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन मागणीची दखल वेळेत न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.सदरच्या या निवेदनावर रयत संघटना, ईगल ग्रुप, व्यापारी वर्ग व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान उपसरपंच विशाल जाधव यांनी ग्रामपंचायतीकडे जागेचा अभाव असल्याने सदरचा प्रश्न रखडला असल्याचे सांगितले.दिनांक २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी जागा निश्चित करुन ठोस निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली आहे.