टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
मध्यप्रदेश राज्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून निघालेल्या शिवस्वरूप जनार्दन स्वामी पायी कावड यात्रेचे आज (बुधवारी) जाफराबादेत भक्तिमय तथा जल्लोषात आगमन झाले यावेळी तरुणांनी हातामध्ये शिव शंकराची मूर्ती घेऊन गाव प्रदर्शना केली तसेच महिला भजनी मंडळांनी यावेळी भजन भारूड अंभग म्हणत व फुगडी पावली खेळत ओंकारेश्वर ओंकारेश्वर येथून कावड यात्रा घेऊन आलेल्या सहाही भाविकांचे जंगी स्वागत केले तर तरुणाई शिवशंकर तांडवावर फिरवली ही पायी कावड यात्रा मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून १० ऑगष्ट रोजी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर मंदिरापासून ३११ किलोमीटरचे पायी अंतर पार करून शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे २० ऑगस्ट बुधवार रोजी दाखल झाली यावेळी टाळ मृंधुग,ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीने यात्रेचे स्वागत करण्यात आले .
गोंधनखेडा येथील गौरीशंकर तथा जनार्दन स्वामी आश्रमात मठाधिपती महेशगिरी महाराज यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. गेल्या १० दिवसांपासून खांद्यावर कावड घेऊन विशाल बबनराव दांडगे, साहेबराव अंभोरे, रमेश वाघमारे, राहुल पवार, नारायण पोटे, दगडुबा शेळके हे जाफराबाद तालुक्यातील सहा भाविक चालत आले. या यात्रेत सहभागी झालेल्या व कावड यात्रा घेऊन आलेल्या सर्व भक्तांचे संत जनार्दन आश्रमाचे मठाधिपती पपु महेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते स्वागत होणार भव्य स्वागत करण्यात आले. या कावड शोभायात्रेत तालुक्यातील हरपाळा, हिवरा, बोरगाव, जाफराबाद, गोंधनखेडा सावंग यासह तालुक्यातील विविध गावातील भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला यात महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती होती . शहरातून निघालेल्या या भव्य शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे काढण्यात येणार आहे. स्वामी जनार्दन महाराज आश्रम सेवा समितीने आभार मानले .
Social Plugin