Ticker

6/recent/ticker-posts

अंतुर्ली येथील दादासो रामभाऊ तराळ दूध उत्पादक सहकारी सोसायटी या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध



किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी 

अंतुर्ली येथील दादासो. रामभाऊ तराळ दूध उत्पादक सहकारी सोसायटी लि. अंतुर्ली या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली त्यानंतर सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुनील माळी यांच्या उपस्थितीत चेअरमन,व्हाईस चेअरमन निवड सुद्धा बिनविरोध पार पडली यावेळी सर्वांनी आग्रहपूर्वक संस्थेचे संस्थापक सदस्य विनोदभाऊ तराळ यांची चेअरमन पदी निवड केली तर व्हाईस चेअरमन पदी सौ.उषाबाई सुधाकर पाटील यांची निवड झाली.यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक प्रल्हाद दवंगे,विलास पाटील,बाळू महाजन,वसंतराव दुट्टे,शरद तराळ,विजय दाणी,अशोक हेरोळे,महेंद्र दुट्टे,सुधाकर मेढे,उपस्थित होते.तर मार्गदर्शन सुधीरभाऊ तराळ, गणेश भाऊ तराळ,नीलकंठ महाजन,योगीराज महाजन, शेख भैयाजी,रवींद्र महाजन,फकिरा दवंगे, बाबुराव तराळ,वामनराव दवंगे यांनी केले तर कामकाज संस्थेचे सचिव श्री.विजय धनगर यांनी पाहिले.