Ticker

6/recent/ticker-posts

अन्यायकारक संचमान्यता मसुद्याविरोधात नाशिक येथे धरणे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न



ग्रामीण प्रतिनिधी आरिफ खान 

 प्रस्तावित अन्यायकारक संचमान्यता मसुदा रद्द करून प्रचलित पद्धतीनेच संचमान्यता लागू करावी, या मागणीसाठी गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे शिक्षक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रस्तावित संचमान्यता मसुद्यानुसार विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या २० वरून ३० अथवा ४० करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलामुळे विज्ञान शाखेतील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना नव्या संचमान्यता धोरणामुळे हजारो पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ किंवा तासिका तत्त्वावर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यावेळी आयोजित धरणे आंदोलनात प्रा. नंदन वळिंकार यांनी मनोगत व्यक्त करताना प्रस्तावित संचमान्यता मसुदा शिक्षक, विद्यार्थी व शिक्षण व्यवस्थेसाठी घातक असल्याचे सांगितले. शासनाने शिक्षकांच्या हिताचा विचार करून सदर मसुदा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनाला मार्गदर्शक म्हणून आदरणीय डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रा. शैलेश राणे, अनिल जटाळे, स्वप्नील पवार, विठ्ठल बडगुजर, मिलिंद बडगुजर, गजानन पाटील, गणेश वाणी, जितेश संदानशिव, भालचंद्र शेलकर, भानुदास गुळाले, सी. आर. पाटील, देवेंद्र वानखेडे, दीपक पवार, गुणवंत पाटील, गोपाळ पाटील, स्वप्नील भांडारकर तसेच श्रीमती कविता माळी, सुनीता कापसे, ललिता भंगाळे, मेघना पवार, प्रतिमा लांडगे, मनिषा पाटील, रोहिणी पाटील, पूनम शिंदे, सविता पाटील यांच्यासह नाशिक विभागातील मोठ्या संख्येने शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने प्रस्तावित संचमान्यता मसुदा मागे घेऊन प्रचलित पद्धतीनेच संचमान्यता लागू करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.