ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम कासराळी येथे दरवर्षीप्रमाणेच बुधवार दि.२४ जून रोजीच्या राञी अनुक्रमे १,२ वाजता थोरले,धाकले लालसाब अर्थात नाले हैदर सवारींचा मध्यरात्रीपासून पवित्र मोहरम सण भाविकांसह उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक वर्षापासून चालत असलेली ही मोहरम सणाची परंपरा खरेतर हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक ठरली आहे.
थोरले लालसाब अर्थात नाले हैदर पीर पंजा सवारी मानकरी शहा अहेमद टेलर यांच्या घर परिसरातून मध्यरात्री १:३० वाजता वाजत गाजत मिरवणूक निघून निजामकालीन घुमट परिसरातील धाकले लालसाब अर्थात नाले हैदर पीर पंजा सवारी येथे(भावांची)भेट झाल्यानंतर गावातील लोकप्रिय मुख्य धाकले लालसाब सवारी मिरवणूक उत्सवाला सुरूवात होते.गुरुवार दि.२५ जून रोजी सकाळी १०:३० वाजता धाकले लालसाब सवारीचे वाजत गाजत परंपरागत विसर्जन (थंड)करण्यात येते.
थोरले लालसाब पीर पंजा सवारी उत्सवाचे मानकरी शहा अहेमद टेलर, शहा उस्मान, शहा मैनोद्दीन,धाकले लालसाब सवारीशेख उस्मानसाब नन्हेसाब,शेख हमीद उस्मान, शेख इस्माईलसाब,मशाल मानकरी सुधाकर इजुलकंठे,दंतापल्ले आदी परिवार मानाचे मानकरी परंपरागत ठरलेले आहेत.
थोरले,धाकले लालसाब अर्थात नाले हैदर, इमाम हुसेन, मौलाली, चाँदपीर, कासिम दुल्हे आदि पीर पंजा सवारींची प्रतिष्ठापना केली जाते. निजामकालीन काही गोल मस्जिद घुमट,विहिर,कब्रस्तान, मोहर्रम दर्गा, हनुमान मंदिर, गाडगेबाबा मंदिर,वाल्मिक ॠषी या परिसरात हा मोहरम सोहळा सलग दहा दिवस हिंदू-मुस्लिम भाविक साजरा करतात. पैशांच्या माळा,नवीन वस्त्र, रंगीबेरंगी बाशिंग, गुळ, साखर, शरबत, मिठाई, बत्ताशे, खोबरे एकमेकांस वाढवून गहू, तांदूळ भाविकांकडून दान दिले जाते.
नर्तक,हलगी वाद्य वादकांनी उजलाजी इंगळे व परिवारयांनी राञभर व दिवसा रंगत आणलेली होती.गावातील बाईलेकी, पाहुणे,ग्राम, तालुका, शासन, प्रशासन, आजी-माजी पदाधिकारी, कासराळी परिसरातील नवसधारी भाविक तथा समस्त गावकरी मंडळी यांची यंदाही उल्लेखनीय उपस्थिती होती.





Social Plugin