मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
मेडशी: मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मेडशी ते आधारसावंगी रस्त्यालगतच्या उमरवाडी पाझर तलावाजवळील सांडव्याच्या खालील नाल्यामध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजताच्या सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सदर मृतदेह सुमारे ५० ते ५५ वयोगटातील पुरुषाचा असून, मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस प्रशासनाने त्याचे तपशीलवार वर्णन जाहीर केले आहे. अनोळखी मृत व्यक्तीचे तपशील पुढीलप्रमाणे : वय : अंदाजे ५० ते ५५ वर्षे उंची: अंदाजे १७० सेमी बांधा: मजबूत वेशभूषा : अंगात करड्या रंगाचे फुलबाह्याचे नेहरू शर्ट पांढऱ्या रंगाची चैन असलेली फुल पँट कंबरेला लाल रंगाचाकरदुडा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणीही सदर वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले असेल, किंवा ओळख पटवता येईल असा कोणी संबंधित असेल, तर त्यांनी त्वरीत पोलीस ठाणे मालेगाव, जि. वाशिम येथे संपर्क असे आवाहन संपर्क अधिकारीः पो.हे.कॉ. निलेश अहिर यांनी केले आहे.
Social Plugin