अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
आर्ट ऑफ लिविंग परिवार जालना यांच्या वतीने महेश भवन,जालना येथे “आनंद की अनुभूती” या योग,प्राणायाम व ध्यान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये तब्बल 208 प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सहभागींसाठी रोज योग,प्राणायाम व ध्यानाचे सत्र घेतले जात असून,आधुनिक जीवनातील वाढता ताण-तणाव,नकारात्मक विचार व निराशा दूर करण्यासाठी योग ही एक प्रभावी जीवनशैली असल्याचा संदेश देण्यात येत आहे.संपूर्ण जगभरातील 216 देशांमध्ये कार्यरत असलेली आर्ट ऑफ लिविंग संस्था विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ऋषीमुनींच्या ज्ञानपरंपरेचा प्रसार करत आहे.याचाच एक भाग म्हणून,देशभरातील सर्व आर्ट ऑफ लिविंग केंद्रांवर 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान“आनंद अनुभूती” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार जालना शहरात महेश भवन येथे हे शिबिर भव्य स्वरूपात सुरू आहे.शहर व ग्रामीण भागात आर्ट ऑफ लिविंगचे कार्य सातत्याने वाढत असून, जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.योग, प्राणायाम,ध्यान याबरोबरच सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांना या प्रवाहाशी जोडण्याचे कार्य संस्था करत आहे.हे शिबिर आर्ट ऑफ लिविंगचे वरिष्ठ प्रशिक्षक जय मंगल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून,प्रशिक्षक म्हणून श्री अनिल खलसे,श्री सतीश तायडे,सौ आरती ठाकूर, सौ अंजली चिंतामणी,सौ कविता वाबळे-शितोळे, श्री शिवाजी किंगरे,सौ अर्चना जयस्वाल,सौ सिंधुताई निर्वे यांनी योगदान दिले आहे.शिबिर यशस्वी करण्यासाठी साधक म्हणून अजित शितोळे,संदीप मगर पाटील,शशांक जयस्वाल, संतोष डोंगरकोस,नरेश भांदर्गे,महेश चव्हाण, सुरेखाताई चव्हाण,स्वाती अंडील,डॉ.आरती गायकवाड,अनिल वाघमारे,प्रशांत हीरप,नीरज मंत्री,विष्णू काळूसे,गीता काळूसे,अंजली ठाकूर, यमुना पालवे,सूरश्री अय्यर,वैभव देशपांडे,उमेश पूरी,साक्षी तायडे,ज्ञानेश्वर कबाडे,गंगा बुरांडे दिदी आदींचा सहभाग उल्लेखनीय राहिला.या शिबिराला जालन्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,पुढील काही दिवसांत अधिकाधिक लोकांना योग,प्राणायाम आणि ध्यानाचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
Social Plugin