Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित हायस्कूल जुनियर कॉलेज पुसेगाव येथे डॉ. एस. आर. रंगनाथ यांचा जन्मदिन अर्थात "राष्ट्रीय ग्रंथपाल दिन " उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेचे विश्वस्त व वाचन चळवळीचे मार्गदर्शक श्री एस. आर.पाटील सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रंगनाथन यांच्या कार्याची ओळख करून दिली.

 ते म्हणाले  गणित विषयाचे अध्यापक असून सुद्धा वाचन चळवळ भारतभर पोचवण्याचे त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत होते. सर्वसामान्यापर्यंत ग्रंथ आणि ग्रंथालयाचा प्रसार करण्याचे त्यांचे योगदान फार मोठे असे आहे.ग्रंथ वाचक व ग्रंथपाल यांच्या योग्य वैचारिक देवाणघेवाणीतून समृद्ध व आदर्श वाचनालय निर्माण होत असते.ग्रंथपाल व वाचन प्रेमी श्री गोवर्धन जाधव सर यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. श्री मोहनराव गुरव यांनी प्रास्ताविक केले  प्राचार्य श्री दत्तात्रय गोफने यांनी ग्रंथांचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.