Ticker

6/recent/ticker-posts

इंडीया मिशन अर्तगत कारंजा लाड येथे सायकल मॅरेथॉन रॅलीच आयोजण



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

 कारंजा लाड शहर येथे मा. पोलीस अधिक्षक साहेब वाशिम यांचे संकल्पणेतुन फिट इंडीया मिशन अर्तगत सायकल मॅरेथॉन रॅलीचे आयोजण मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी सा कारंजा यांची मार्गदर्शनाखाली उपस्थित पोलीस निरीक्षक श्री शुक्ला साहेब पो स्टे कारंजा शहर तसेच पोलीस निरीक्षक श्री शिंदे साहेब पो स्टे कारंजा ग्रामीण यांचे उपस्थितीत करण्यात आले. 

कारंजा शहर येथील महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, कारंजा उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच Ruf and tuff ग्रुपचे सदस्य असे 200 ते 225 स्पर्धकांनी सायकल मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहात भाग घेतला होता. सर्वधर्म मित्र मंडळ ची जय गजानन रुग्णवाहिका रुग्णसेवक दीपक सोनवणे हे सुद्धा उपस्थित होते यांनी आपली सेवा दिली सदर सायकल स्पर्धेपूर्वी टी-शर्ट व कॅप स्पर्धकांना वाटप करण्यात आले. त्यानंतर रॅली स्पर्धा झाशी राणी चौक येथून सुरुवात होऊन जाणता राजा चौक, डॉ आंबेडकर चौक, जयस्तंभचौक, नेहरू चौक, मेडिकल चौक, नगीना मज्जिद, महात्मा फुले चौक, रामा सावजी चौक, दत्त मंदिर चौक, पोहा वेश परत झाशी राणी चौक येथे येऊन समाप्त झाली. पहिले पाच स्पर्धकांना व लहान मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.