दोन गंभीर जखमी भरधाव पिकअपची तीन दुचाकींना धडक
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा कारंजा दारव्हा मार्गावरील पॉवर हाऊस जवळ रविवारी सकाळी १० वाजता भीषण अपघात घडला, यावेळी एका भरधाव पिकअप ने दोन दुचाक्यांना जबरदस्त धडक दिली. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले. कारंजा दारव्हा मार्गावर पॉवर हाऊसजवळ रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या एका पिकअप वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की एक दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली, तर दुसरी दुचाकी खाली पडली. नाना जयसिंगपुरेरा यशवंत कॉलनी कारंजा आणि सुभाष किसन चव्हाण रा. शिक्षक कॉलनी कारंजा अशी मृतांची नावे आहे तर जया नाना जयसिंगपुरे वय ४० वर्ष आणि प्रभू माणिक राठोड वय ४० वर्ष असे जखमीचे नाव असून यातील महिला ही कारंजा येथील तर पुरुष का कारंजा तालुक्यातील कामठवाडा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक शंकर रामटेके, रमेश देशमुख व शिवम खोड यांनी जखमीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. तपासणी दरम्यान यातील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेर गावी पाठविले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये वाहनचालकांच्या बेफिकिरीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारंजा दारव्हा मार्ग हा नेहमीच वर्दळीचा असून, अनेकवेळा भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने वेगमर्यादा, सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही नियंत्रण यांची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तर आजच्या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरचा एक क्षणाचा गाफीलपणा अनेकांचे आयुष्य उद्धवस्त करू शकतो. याची आठवण करून दिली, दरम्यान शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
Social Plugin