*सर्व सरपंच ग्रामपंचायत अधिकारी,पालक अधिकारी,केंद्र चालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती*
श्रीवर्धन प्रतिनिधी/ संदीप लाड
दि ,12/09/2025 रोजी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा कुणबी समाज हॉल येथे संपन्न झाली 17 सप्टेंबर ते 31डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असून गावाच्या सर्वागीण विकासासाठी महत्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन या कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता,सुंदर शाळा उभारणी, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे,सौर ऊर्जेचा वापर , महिला बचतगटांचे सक्षमीकरण सुशासन युक्त पंचायत तयार करणे, स्वनिधी,CSR व लोक वर्गणीतून पंचायत राज संस्थाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे,जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय,लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून एक चळवळ निर्माण करणे अशा विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करण्यावर भर द्यावा पारदर्शक कामगिरी आणि सकारात्मक स्पर्धेमुळेच गावांचा सर्वांगीण विकास होतो या अभियानाच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्धा घडणार आहे यासाठी चांगली कामगिरी सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे या अभियानात तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवून या अभियानातील निकषांचा अभ्यास करून त्याप्रमाणे कारवाई केली तर गावचे स्वरूप बदलताना दिसेल असे मत गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी एक दिवसीय कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे, राज्यातील विकासाच्या बहुतांश योजना पंचायत राज संस्था मार्फत राबविला जातात त्या अनुषंगाने ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदांना कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे ग्रामविकास विभाग व शासनाच्या इतर विभागांच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातात सदर योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या आत्तापर्यंत पोहोचविणे यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे ग्रामपंचायत मध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे ग्रामीण नागरिकांना तुला प्रीतीने सेवा देणे महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य शासनाने जाहीर केले आहे.
या कार्यशाळेला प्रांताधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी माधव जाधव माजी सभापती प्रशांत शिंदे ,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक,विस्तार अधिकारी पंचायत समिती किशोर नागे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष नारायणकर पंचायत समिती कक्षअधिकारी गणेश गीते उपस्थित होते





Social Plugin