Ticker

6/recent/ticker-posts

लहान येथिल जिल्हा परिषद शाळेला गावातील व्हाट्सअप ग्रुप तर्फे 16 फॅन ची मदत



ग्रामीण प्रतिनिधी -विश्वराज वाकोडे 

   दि. 20/06/26लहान /अर्धापूर हे गाव स्वतंत्र सैनिकांची भूमी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जाते.  या भुमीतील अनेक तरुण उच्चशिक्षित होऊन मोठं मोठ्या पदावर कार्यरत राहुन सुध्दा त्यांचे आपली जन्मभुमी आपल्या गावावरचे प्रेम, आपुलकी कमी झाली नाही. याचा प्रत्यय गावातील प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये पहायला मिळतो.

आज स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, आपल्या मातृभुमीचे व मातृशाळेचे ऋण फेडण्याचा अनोखा व प्रेरणादायी आदर्श अर्धापूर तालुक्यातील मौजे लहान येथिल भुमीपुत्रांनी घालून दिला आहे.

लहान गावातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळे बद्दल गावातील प्रत्येक नागरिकांच्या मनात प्रेम व‌ आपुलकी पाहायला मिळते. त्यामुळेच तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी काही फॅन भेट देण्याची इच्छा लहान येथिल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर लालमे यांनी दरवळ लहान च्या मातीचा या व्हाट्सअप ग्रुप वर व्यक्त करुन गावातील व्हाट्सअप ग्रुप दरवळ लहान च्या मातीचा या ग्रुप वर मॅसेज टाकल्यामुळे

या व्हाट्सअप ग्रुप चे ॲडमिन जिल्हा परिषदेचे शिक्षक शेख अहेमद सर व माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव इंगळे साहेब आहेत यांनी चांगला उपक्रम आहे म्हणून प्रतिसाद दिला. 

आपण आपल्या मातृभूमीतील शाळेला मदत करावी. म्हणून लहान येथिल डॉक्टर श्री.मा.दिपकराव पुरभाजी देवडे साहेब, पुढे होऊन मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रुप मधील अनेक सदस्यांनी सुध्दा सहभाग घेतला.

यामध्ये लहान गावचे भुमीपुत्र भारतीय स्टेट बँकेचे माजी मॅनेजर श्री.शेख बशीर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.मा. संजयभाऊ लहानकर साहेब, माजी वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर श्री.मा.उत्तमराव इंगळे साहेब, शिक्षक शेख अहेमद सर,

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.मा.डी.के.आडेराघो साहेब, भुमीपुत्र तथा मंडळ अधिकारी श्री.मा.राजेश पाटील इंगळे, शाळेचे माजी शिक्षक श्री.मा.बि.डी.देशमुख सर, लहान येथिल प्रसिद्ध कवी,लेखक श्री.मा.आनंदराव पुपुलवाड सर, लहान नगरी चे उपसरपंच श्री.शेख महेबुब शेख रज्जाक, लहान येथिल जेष्ठ नागरिक श्री.मा.संभाजीराव गच्छे काका,

लहान येथिल महाप्रजापती बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष श्री.मा.पृथ्वीराजजी गच्चे, बॅंक ऑफ इंडिया चे मॅनेजर श्री.मा.दर्शकभाऊ सावंत, कमलेशभाऊ सुंगधे, यांनी पुढे होऊन चांगल्या कामाला हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत केली, 

या व्हाट्सअप ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व उच्च शिक्षीक तरुण अधिकारी, गावातील प्रमुख पदाधिकारी व प्रगतशील शेतकरी आहेत. या ग्रुप मध्ये आहेत. या ग्रुप च्या माध्यमातून गावातील गरिबातील गरिब व्यक्तींना, गावातील निराधारांना, गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी या ग्रुप ची निर्मिती झाली आहे.

आज पर्यंत या ग्रुप च्या अनेक सदस्यानी गावांसाठी व शाळेसाठी भरपुर मदत केली आहे. आजच्या कार्यक्रमाला डॉ.दिपकराव पुरभाजी देवडे यांच्या मातोश्री यमुनाबाई पुरभाजी देवडे व गावातील जेष्ठ नागरिक श्री.मा.संभाजीराव गच्चे काका व लहान नगरी सरपंच श्री.मा.सदाशिव पाटील इंगळे, दरवळ लहान च्या मातीचा या ग्रुप चे प्रतीनिधी म्हणून पृथ्वीराज गच्चे साहेब यांच्या हस्ते शाळेला फॅन देण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती माजी. अध्यक्ष श्री.मा.बबनराव बोक्से पाटील, शालेय व्यवस्थापन समिती लहान चे माजी अध्यक्ष श्री.मा.दत्तराम पाटील इंगळे, नामदेव काळे पाटील, लहान येथिल बसवेश्वर देवस्थान चे पुजारी श्री.मा.विलास स्वामी महाराज, प्रगतशील शेतकरी विलासजी देवडे, बालाजीआप्पा शिवनकर,गणेश श्रीमंगले, वैभवभाऊ रेंगे पाटील,सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गावातील भुमीपुत्रांनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी फॅन उपलब्ध करून दिल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.मा.किशोरजी विधाते सर, जेष्ठ शिक्षक श्री.मा.जाधव सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर लालमे साहेब, शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष प्र.सिध्दांतभाऊ वाहेवळ, सदस्य प्र.राजकुमार लोने, सदस्य प्र.आरुणजी कुऱ्हाडे सह शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी आभार मानले आहेत.