Ticker

6/recent/ticker-posts

गणेशभक्तामध्येही सोन्या बैलाचा क्रेझ;कारंडे परिवाराने साकारला सोन्या बैलाचा देखावा




ग्रामीण प्रतिनिधी / प्रसाद दिनकरराव : 

सोन्या हा सोनारपाडा येथील जयेश पाटील यांचा धनगरी खिल्लार जातीचा देखणा रुबाबदार बैल. त्याला सोनारपाड्याचा सोन्या म्हणूनही ओळखले जाते. सोन्याने हिंदकेसरी, कोकण केसरी सारख्या अनेक शर्यती जिंकल्या आहेत. सोन्या त्याच्या मैदानातील रुबाबदार एन्ट्री व शर्यतीतील चिकाटी साठी प्रसिद्ध आहे. या बैलाची ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे याचं सोन्या बैलावर असलेल्या प्रेमापोटी कारंडे परिवाराने सोन्या बैलाचा गाडाची प्रतिकृती साकारली आहे हा देखावा पाहण्यासाठी बैलगाडा शर्यती प्रेमींनी येत आहेत'5050 सोन्या बैल' हा जयेश पाटील यांचा 'सोनारपाडा' गावातील एक प्रसिद्ध बैल असून हा बैल त्याच्या आकर्षक एन्ट्री आणि शर्यतींमधील सातत्यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.