

गणेश जाधव /महाराष्ट्र ग्रामीण न्युज.जामनेर (विशेष प्रतिनिधी):
महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतरण दिनानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये हा दिन अधिकृत व उत्साहात साजरा केला जावा, या मागणीसाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा व जामनेर तालुका महानुभाव परिषदेच्या वतीने आज, शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेर तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
जामनेर प्रांतातील पूज्य संत, तपस्विनी आणि सद्भक्त वासनिक मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले. श्रीचक्रधर स्वामी यांनी सामाजिक समता, बंधुता, अहिंसा आणि अहिंसेवर आधारित जीवनमूल्यांची शिकवण दिली आहे. त्यांचे हे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी शासकीय स्तरावर अवतरण दिनाचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका या वेळी मांडण्यात आली.
उपस्थित मान्यवर व भाविक:
या वेळी महानुभाव पंथातील साधू-संत, तपस्विनी, परिषदेचे पदाधिकारी तसेच परिसरातील वासनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून या संदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.




Social Plugin