Ticker

6/recent/ticker-posts

जी. प. प्रा. म. शाळा आलेवाडी येथे शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न



आलेवाडी, दि. 13 सप्टेंबर — तालुक्यातील ग्रामपंचायत प्राथमिक मराठी शाळा आलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेला शिक्षक निरोप समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.


या समारंभाचे अध्यक्षस्थान श्री. रामराव वानखडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. हाडोळे मॅडम यांनी केले.श्री. महादेव शेगोकार सर आणि कु. ज्योती धोत्रे मॅडम यांना निरोपदेण्यात आला


कार्यक्रमाला खारोडे सर, एकीरे सर, अंगणवाडी सेविका गोकुळा मॅडम, रोजगार सेवक अनिल भाऊ भोंगळ, बाबाराव दारोकार सौ. साबळे ताई, अंगणवाडी मदतनिस सौ. वानखडे, सौ. रुख्मिणी बाई, सौ. कराळे, सोपान वानखडे, बिट्टू वानखडे तसेच शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी शिक्षकांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले.कार्यक्रम ला विशेष उपस्थिती श्री छावा उपजिल्हा प्रमुख श्री निवृत्ती वानखडे होते.


— निळकंठ वसू, पत्रकार