राजूर,प्रतिनिधी/ प्रकाश परते.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर अजित बाकू नवले (रा पाडळणे) व शैलेंद्र गणपत पांडे (रा. अकोले) या दोघांवर रात्री उशिरा राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोपट काकू चौधरी (रा. धामणवन) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, राघोजी भांगरे यांच्या देवगावातील पुतळ्याचे तसेच परिसराचे शुभोभीकरणाचे काम नवले व पांडे हे ठेकेदार करत आहेत. मात्र बुधवारी दर्शनाकरिता गेलो असता पुतळा नेहमीच्या ठिकाणी दिसला नाही. विचारपूस केली असता ठेकेदार पांडे
यांच्या सांगण्यावरून पुतळा काढून सभागृहात ठेवल्याचे मला सांगण्यात आले. मात्र पुतळा काढण्याची परवानगी कोणी दिली, याचा माहिती पांडे यांनी दिली नाही. सार्वजनिक बांधकाम कार्यालयानेही परवानगी दिलेली नसल्याचे समजले. त्यावरून या ठेकेदरांनी परवानगी नसताना पुतळा जागेवरून काढून आदिवासी महादेव कोळी समुदायाच्या दैवताचा अवमान, विटंबना केली.
दरम्यान, अमित भांगरे, दिलीप भांगरे, बाजीराव सगभोर, अनंत गाणे, तुळसाबाई भांगरे, स्वप्निल धांडे, पंढरीनाथ खाडे, पोपट चौधरी, जितेंद्र भांगरे यांनी देवगाव येथे जाऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.





Social Plugin