Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम येथे बंजारा' समाजाचा सोमवारी भव्य मोर्चा



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

▶ कारंजा शहर व तालुक्यातील सगळ्या तांड्यांमध्ये निवासाला असलेल्या व आदिम लक्षणे असलेल्या बंजारा समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित सोमवारच्या (दि. २९) मोर्चासाठी सुरू असून, गोरबंजारा आरक्षण कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्येक तांड्यांमध्ये समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याची राजधानी मुंबई येथे सुरू केलेल्या आंदोलनाची फलनिष्पत्ती हैदराबाद गॅझेटच्या आधारे संबंधित समाजाला इतर मागास प्रवर्गातून देण्यात आलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने याच राज पत्रामध्ये आदिवासी म्हणून नमूद असलेल्या व राज्यात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गामध्ये असलेल्या बंजारा जमातीला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वाशिम येथे सोमवारी आरक्षण मागणी संदर्भात जिल्हा कार्यालया मार्फत राज्य शासनाला बंजारा समाज बांधवांच्यावतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गाचे सामाजिक आरक्षण मिळावे, यासाठी तालुकाच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महिन्याच्या प्रारंभापासून वेगवेगळ्या प्रकारचे तीव्र स्वरूपाचे स्वरूपाचे आंदोलन आंदोलन सुरू असून, कारंजासह जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील बंजारा समाज बांधव वाशिम येथे आयोजित आंदोलनात - प्रचंड संख्येत उपस्थित राहणार असल्याची चाहूल विविध तांड्यांमधून येत असलेल्या प्रतिक्रिया पुढे येत आहे.