*राष्ट्रीय पञकार संघ भारत संघाच्या वतीने आमदार जितेश अंतापुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*
देगलूर प्रतीनीधी
बिलोली तालूक्यात झालेल्या ढगपूटीदृश्य पावसामुळे मन्याड मांजरा लेंढी नदीमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे भाडेतत्त्वावर शेती करणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने भाडेतत्त्वावर शेती करणार्या शेतकऱ्यांची चौकशी करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रीय पञकार संघ भारत संघटनेच्या वतीने बिलोलीचे तहसिलदार यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी कि बिलोली तालूक्यात मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावर ( बटाऊ ) शेती केली जाते पाडव्याच्या मुहूर्तावर मुळ सातबारा मालकाकडुन विशिष्ट रक्कम देऊन एक वर्षासाठी शेती केली जाते शेती मशागती पासून तरपिक काढणी पर्यंत सर्व खर्च बटाऊ शेतकरी करीत आहेत दरवर्षी निसर्गाच्या कोणकोणत्या कारणांमुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नूकसान होत आहे या नूकसान भरपाईचे शासनाकडुन मिळणारे अनुदान विमा हे मुळ सातबारा मालकाआ मिळत आहे त्यामुळे सर्वसामान्य बटाऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सहन करत आहेत यावर्षी आॉगस्ट महीन्यात झालेल्या ढगपूटीदृश्य पावसामुळे मन्याड मांजरा नदीच्या काठावर असलेल्या पाण्याच्या प्रवाहात हजारो एकर जमीनीचे नूकसान झाले आहे त्यामुळे भाडेतत्त्वावर शेती करणार्या शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळे शासनाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतकऱ्यांना मूळ शेतकऱ्यांप्रमाणे नूकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय पञकार संघ भारत संघटनेच्या वतीने बिलोली देगलुर आमदार जितेश अंतापुरकर याना जिल्हा अध्यक्ष इर्शाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी बिलोली तालूका उपाध्यक्ष विलास शेरे सचिव दयानंद भद्रे भास्कर भालेराव शिवलिंग गायकवाड उपस्थित होते





Social Plugin