Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड येथील कुलस्वामिनी श्री कामाक्षा देवी नवरात्रोत्सवास प्रारंभ



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

कारंजा लाड येथील पौराणिक काळात वसिष्ठ ऋषींच्या सप्तर्षी शिष्यमंडळी पैकी, करंज ऋषींनी तपश्चर्या करून स्थापन केलेल्या कारंजा नगरीमधील, आद्यशक्ती कारंजेकरांची कुलस्वामिनी आणि शिवछत्रपती शिवरायांचे आराध्य ऐतिहासिक शक्तीपीठ असलेल्या श्री. कामक्षा देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला सोमवार दि.२२ सप्टेंबर पासून *शुभारंभ होणार असून, श्री नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण भारतात श्री. कामाक्षा देवीचे दोन ठिकाणी शक्तीपीठ आहेत. त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी व दुसरे वाशिम जिल्ह्यातील पवित्र शक्तिपीठ कारंजा नगरी होय. श्री कामाक्षा माता ही नवसाला पावणारी मनोकामना पूर्ण करणारी जागृत देवी म्हणून ओळखल्या जाते. दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्य भव्य यात्रा मंदिर परिसरात भरत

असते. या मंदिराचा कारभार महाजन कुटुंबाकडे आहे. सोमवार दि २२ सप्टेंबर रोजी देवीचा मंगलाभिषेक व घटस्थापना होणार आहेदि १ ऑक्टोबर नवमी असल्यामुळे देवीचा महानैवेद्य व रात्री ७:३० ला सौ अर्चनाताई तोमर यांचा कराओके वर भक्ती संगीताचा कार्यक्रम, दि. २ ऑक्टोंबर ला विजयादशमी निमित्त सकाळी महाभिषेक, श्री कामक्षा मातेचा श्रृंगार व सिमोलंघन होऊन देवीची महाआरती होईल, नवरात्र उत्सवात दररोज देवीची आरती दुपारी १२ वाजता व रात्री ७ वाजता होईल, श्री कामाक्षा मातेच्या दर्शनाचा लाभघेण्याचे आवहान श्री. कामक्षा माता संस्थान कडून श्री दिगंबर महाजन महाराज व नवरात्रोत्सव समिती आणी आई श्री. कामाक्षा भक्त परिवाराचे संजय कडोळे यांचे कडून करण्यात आले