Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड शिवसेना (शिंदे गट) तर्फे आयुष्यमान भारत व लाडकी बहीण योजना केवायसी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



बाळासाहेब पवार उमरखेड (प्रतिनिधी) 

शिवसेना (शिंदे गट) तर्फे नागरिकांच्या सेवेसाठी आयोजित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व लाडकी बहीण योजना केवायसी शिबिराला उमरखेड शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली कागदपत्रे पडताळून घेतली.

या शिबिरात नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा लाभ, तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी दरमहा आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी आवश्यक केवायसी प्रक्रिया सुलभ पद्धतीने करून देण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी नागरिकांना योजनांची माहिती देत ऑनलाईन नोंदणी करून दिली.

या उपक्रमामुळे नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळविण्यास मदत झाली असून, शिवसेना (शिंदे गट) जनसेवेच्या माध्यमातून समाजाशी अधिक घट्ट नाते जोडत असल्याचे दिसत आहे. उद्याला गोकुळनगर येथे सदर शिबिर सुरू राहील व त्यानंतर शिवसेना संपर्क कार्यालय गिरी कॉम्प्लेक्स पुसद रोड उमरखेड येथे दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत शिबिर सुरू राहील. तरी या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना पक्षाचे पदाधिकारी  यांनी केले आहे. यावेळी सहसंपर्क जिल्हा प्रमुख चितंगराव कदम सर, शहर प्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव, कैलासराव कदम माजी जिल्हाप्रमुख, अनिलराव नरवाडे निवडणूक निरीक्षक, अतुल मैड, दामोदर इंगोले उपशहरप्रमुख, बसवेश्वर क्षीरसागर उपशहरप्रमुख व युवासेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.