छायाचित्र _ पुसेगाव कु. शिवाली हणमंत घाडगे या विद्यार्थिनीची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महिला संघामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी भोसले समवेत प्रा. डॉ.संजय क्षीरसागर ,प्रा.डॉ.अनिल जगताप प्रा. गौरव जाधव छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
बुघ दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.शिवाली हणमंत घाडगे एम. ए.भाग २ (हिंदी ) विद्यार्थिनीची वेस्ट झोन महिला कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महिला कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे. कबड्डी खेळातील पहिली विद्यापीठ खेळाडू म्हणून बहुमान पटकावून महाविद्यालयाचे नाव उंचावलेले आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले , रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद ,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर उप प्राचार्य डॉ.अनिल जगताप, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. गौरव जाधव तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर सेवक, माझी विद्यार्थी अरुण मदने यांनी अभिनंदन केले.





Social Plugin