अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
महा पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने अंबड तालुका अध्यक्षपदी राजेंद्र रघुनाथ मातोळे यांची निवड करण्यात आली आहे.संस्थेच्या ध्येय धोरणांना अनुसरून आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.राजेंद्र मातोळे यांची निवड महा पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे व उप संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पवार तसेच महाराष्ट्र संपर्कप्रमुख रमेश बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष राजेंद्र मातोळे यांच्यावर अंबड तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढवण्याची व पोलीस प्रशासनाला मदतीचा हात देण्यासाठी मित्रत्वाची भूमिका अधिक मजबूत करण्याची जबाबदारी असणार आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.





Social Plugin