Ticker

6/recent/ticker-posts

पारनेर पंचायत समिती गणासाठी संजय आबा जाधव यांचे विकासाचे मॉडेल;

 



*जनसेवेच्या कार्यामुळे परिसरात ‘रोखठोक नेता’ म्हणून ओळख!*
*धडाकेबाज नेता! संजय आबा जाधव यांचे लोककल्याणासाठी'अहोरात्र'काम*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 जनसेवा हेच व्रत मानून,आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि 'रोखठोक नेता' म्हणून ओळखले जाणारे संजय आबा जाधव यांनी केवळ त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपरी येथेच नव्हे,तर संपूर्ण सर्कलमध्ये विकासकामांचा अक्षरशःडोंगर उभा केला आहे.तंटामुक्ती अध्यक्ष,माजी उपसरपंच (१० वर्षे ग्रामपंचायत सदस्य) आणि भाजपाचे तालुका उपाध्यक्ष या विविध पदांवर काम करताना त्यांनी गोरगरीब आणि वंचितांसाठी केलेले निस्वार्थ कार्य आज परिसरासाठी एक आदर्श ठरले आहे.

💧 *जलक्रांती आणि आरोग्य सेवक*

संजय जाधव यांनी वॉटर संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामाची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.त्यांनी गरजू कुटुंबांसाठी ७० हजार रुपये किमतीची ८५ शौचालये मोफत उपलब्ध करून दिली.याशिवाय धनगर पिंपरी,पारनेर,शेवगा आणि लालवाडी या चार ठिकाणी प्रत्येकी पाच अशा एकूण २० ठिकाणी हातपंप बसवून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

वॉटर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक स्प्रिंकलर योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली,ज्यामुळे अनेक गरिबांना शेतीसाठी पाण्याचा फायदा झाला.वंचितांना आधार आणि रुग्णसेवा केवळ पाणी आणि आरोग्यावरच नव्हे,तर निराधारांना आधार देण्यासाठीही त्यांचे कार्य मोलाचे आहे.

त्यांनी 'संजय गांधी निराधार' योजनेतून सुमारे ३०० निराधारांना नियमित वेतन/मदत मिळवून दिली.तसेच,अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजनेतून (PM) सतत पाठपुरावा करून अनेक गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळवून दिले.विशेष म्हणजे,ते कोणत्याही रुग्णकाच्या सेवेसाठी तात्काळ हजर असतात आणि रुग्णकांना त्यांच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे सर्कल मधील एकमेव व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

गावाचा विकास आणि युवा प्रेरणा धनगर पिंपरी येथील स्मशानभूमी शेडचे बांधकाम असो,किंवा कर्जत रस्ता धनगर पिंपरी ते नागझरी पानंद रस्ता मार्गी लावणे असो,गावाच्या मूलभूत सुविधांसाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत.त्यांनी कोणत्याही पदावर असोत किंवा नसोत,अहोरात्र जनसेवेचे व्रत पाळले आहे.तसेच,तंटामुक्ती अध्यक्ष असताना त्यांनी गावाला २ लाख रुपयांचे युवक बक्षीस मिळवून दिले,जे परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले.

 *संघर्ष आणि समर्पण असणारा कार्यकर्ता*

संजय आबा जाधव यांच्या कार्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे,ते केवळ गावापुरते मर्यादित राहिले नाहीत.कोणत्याही समाजाच्या आरक्षणासाठी किंवा सामाजिक न्यायासाठी लढ्यात ते नेहमी हजर असणारे एकमेव आणि रोखठोक नेते म्हणून सर्कलमध्ये ओळखले जातात.कोणत्याही योजनांचा फायदा देताना त्यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही,म्हणूनच त्यांची प्रतिमा एक निस्वार्थ लोकसेवक अशी तयार झाली आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी हजर असणारे,गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे आणि विकासकामांमध्ये सातत्य ठेवणारे संजय आबा जाधव यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या धडाकेबाज नेतृत्वामुळे आणि लोककल्याणाच्या कार्यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्यावर भरभरून कौतुक करत आहेत.