विशाल पाटील प्रतिनिधी
पोर्ले तर्फ : केर्ले ते दालमिया कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर ऊस भरून उभी असलेल्या ट्रॅालीला पाठीमागून चारचाकी धडकल्याने चारचाकीतील चालक जागीच ठार झाले आहेत.राजाराम दिनकर गंधवाले (वय ३८, रा.कोतोली,ता.पन्हाळा) असे मृत चालकाचे नाव आहे.गंदावाले कोल्हापूरातील पाटबंधारे विभागात लिपीत पदावर काम करत होते.अपघातनंतर ट्रॅक्टर चालक रावसाहेब महादेव काळे (वय ४८,रा.तारदाळ ता.हातकणंगले) घटनास्थळावरून पळून गेला होता.करवीर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.ऊस हंगाम सुरू झाल्याने, ऊस हंगामातील वाहतुकीचा पहिला बळी राजेंद्र गदवाले यांचा गेल्याची परिसरात चर्चा आहे.
घटनास्थळआणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी (दि.८) रात्री राजेंद्र गंधवाले मित्रासमवेत गणपतीपुळे येथून देवदर्शन घेऊन गावाकडे येत होते.रविवारी रात्री दोनच्या सुमारास कोतोली फाटा येथे मित्राच्या गाडीतून उतरून स्वत:च्या चारचाकीतून कोतोली गावाकडे जात होते.दालमिया कारखान्याला ऊसाची खेप घेऊन आलेला ट्रॅक्टर केर्ले ते आसुर्ले दरम्यानच्या रस्त्यावरील इस्सार पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर उभा होता.रस्त्यावर असुरक्षितरित्या उभी असलेली ऊसाची ट्रॅाली गंधवाले यांना दिसली नसल्याने वेगात असणारी चारचाकी गाडी थेट ऊसाच्या ट्रॅालीवर आदळली.जोराच्या धडकेत ऊसाच्या ट्रॅालीचे चाके फुटले तर चारचाकीच्या गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूरा झाला आहे.धडकेत गाडीचे स्टेअरिंग आणि सीट याच्या मध्ये गंधवाले सापडल्याने त्यांचा जागीच मृ्त्यू झाला.घटनास्थळावरून ट्रॅक्टरचा चालक पळून गेल्याने पन्हाळा पोलिस पेट्रोलिंग करून परतत असताना अपघात झाल्याचे तासानंतर समजले.करवीर पोलिसांनी ट्रॅक्टर,ट्रॅाली चालकासह चारचाकी गाडी ताब्यात घेतली आहे.
राजाराम गंधवाले कोल्हापूरातील पाटबंधारे विभागात लिपीक पदावर काम करत होते.त्यांची पत्नी प्राथमिक शिक्षिका आहे.त्यांनी कोतोली येथे कोतोली को-ॲाप्रेटिव्ह सोसायटी नावाने संस्था काढली आहे.त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.त्यांनी जिल्ह्यात तीन शाखा सुरू केल्या आहेत.त्यांच्या मनमिळावू स्वभामुळे कोतोली परिसरात चांगला गोतावळा असल्याने अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,दोन मुलं आहेत.
ट्रॅालीला रिपलेक्टर असते तर…
ऊस हंगाम सुरू झाल्याने रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.रस्ते वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ऊस वाहतुक सुरू आहे य.हा काय यावर्षीचा अनुभव नाही.जिल्हा वाहतुक नियंत्रण आणि साखर कारखाने ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर लावण्याची सक्ती करत असताना वाहतुकदारांकडून सुरक्षेचे नियमांचे नियम पाळले जात नाही.अपघात झालेल्या ऊसाच्या ट्रॅालीला रिप्लेक्टर लावले नव्हते की वाहन रस्त्यावर वाहन उभे केल्याने अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.वाहनाने रिप्लेक्टर लावले असते तर गंधवाले यांचा जीव गेला नसता.





Social Plugin