Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यनिष्ठेचा आदर्श – पोलिस कॉन्स्टेबल मा. किशोर पाटील साहेब अकोला



 पोलिस दलात कार्यरत असताना पोलिस कॉन्स्टेबल मा. **किशोर पाटील साहेब** यांनी आपल्या कार्यातून खऱ्या अर्थाने पोलिस वर्दीचा मान राखला. त्यांचा कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती असलेले समर्पण हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

मा.किशोर पाटील साहेब हे फक्त पोलिस नव्हते, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी सतत जागृत राहणारे प्रहरी होते. दिवस असो वा रात्र, सुट्टी असो वा सण, त्यांनी नेहमी आपल्या जबाबदारीला जवळून व दक्षता पूर्वक प्राधान्य दिले. लोकांच्या समस्यांकडे त्यांनी केवळ शासकीय कर्तव्य म्हणून नव्हे, तर आपलेपणाने स्वतःच्या स्वखर्चाने जेवढे होईल तेवढे गरीब लोकांकडे सत्य वृत्तीने पाहिले. 

त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि मदतीच्या वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात घर करून राहिले. गावातील प्रत्येकजण त्यांना “आपले पोलिस” म्हणून ओळखतो. किवा आपल्या कुटुबातील एक मेम्बर म्हणून त्यांची ओळख केल्या जातो. गुन्हेगारीवर कठोर आणि जनतेशी प्रेमळ – हाच त्यांचा स्वभाव. जेनतेच्या मनात आजही खेळतो.उरळ बु. पोलिस स्टेशनच्या कार्यकाळात त्यांनी अनेक वेळा संकटाच्या प्रसंगी धैर्याने, निर्धाराने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना सुद्धा सहकार्याचा हाथ , सुरक्षिततेचा आणि न्यायाचा विश्वास मिळाला.आजही त्यांची आठवण घेताना प्रत्येक सहकारी आणि नागरिक मनोमन अभिमानाने त्यांना म्हणतो —“हीच खरी पोलिस सेवा – जी जनतेसाठी, न्यायासाठी आणि समाजाच्या शांततेसाठी त्यांनी सद्भावनेने अमलांत आणली .”मा. किशोर पाटील साहेब, आपल्या कर्तव्यभावनेला आणि सेवाभावाला आमचा शतशः सलाम!