महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी रहाटणी पिंपरी चिंचवड
११ नोव्हेंबर रोजी आळंदी नगरीत भक्तिमय वातावरणात ह.भ.प. संजय महाराज दराडे (वंजारवाडी) यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कीर्तनाने उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श केला. संजय महाराजांनी आपल्या मधुर वाणीने आणि ज्ञानरूपी संदेशांनी सर्वांना भक्तीमार्गाचे महत्व समजावून सांगितले.
कीर्तनाचा विषय "भक्तीचा खरा अर्थ" असा होता, ज्यामध्ये त्यांनी संतांच्या जीवनातील आदर्श, विठ्ठलभक्तीचे सामर्थ्य आणि सदाचाराचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या प्रभावी वाणीने भाविकांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू आले आणि संपूर्ण परिसर "जय जय राम कृष्ण हरी" या गजराने दुमदुमला.
या कीर्तन सोहळ्यासाठी ह.भ.प. डोईफोडे महाराज आणि ह.भ.प. संजय ढाकणे महाराज (महारचिखना) यांनीही उपस्थिती दर्शवली,दर वर्षा प्रमाणे याही वर्षी अन्नदानाचे अन्नदाते प्रल्हाद ढाकणे व दादाराव घुगे महारचिखना हे होते. त्यांनी भाविकांसाठी प्रेमाने प्रसादरूपी जेवणाची व्यवस्था केली.या पवित्र प्रसंगी अनेक भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून विठ्ठलनामाचा आनंद घेतला. शेवटी सर्व आयोजकांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले





Social Plugin