अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

अंबड येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित कै.दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलातील  कर्मचाऱ्यांनी स्थानिक व्यवस्थापन समिती कार्यवाह मा.श्री.केदारजी मंत्री तसेच मुख्याध्यापक श्री.प्रदीपजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार सेवा प्रमुख व सहल प्रमुख श्री.शरद माळोदे,सहल सहप्रमुख श्रीमती.मेघा वायकोस यांच्या नियोजनानुसार संघ शताब्दी वर्षानिमित्त नागपूर अभ्यास दौरा पूर्ण केला.

या अभ्यास दौऱ्यामध्ये संघ मुख्यालय,संघाची पहिली शाखा लावली तो मोहितेंचा वाडा,आज पर्यंत मा.सरसंघचालकांना  जेवढ्या भेट वस्तू मिळाल्या त्या वस्तूंचे संग्रहालय,कल्पतरू पुस्तक संग्रहालय,डॉ.हेडगेवार भवन,रेशीम बाग परिसरातील स्मृती भवन,डॉ हेडगेवार व प.पू.गोळवलकर स्मृती स्थळ इत्यादी ठिकाणी भेट देऊन डॉ. केशव बळीराम हेडगेवार व अन्य सर्व सरसंघचालक यांच्याविषयी अधिक माहिती घेतली.

स्मृती स्थळांचे स्वागत कक्ष प्रमुख विकास तेलंग यांनी संघाची कार्यपध्दती,प्रशिक्षणाचे स्वरुप याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच श्रीमती.सुवर्णलता खानापूरकर यांनी "पूर्ण करेंगे हम सब केशव यह साधना तुम्हारी..." हे पद्य गायन केले.शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.प्रदीपजी जोशी यांनी पूजनीय डॉ.हेडगेवार यांच्या स्मारक व स्मृतिस्थळाविषयी तसेच सर्व परिसरा विषयी माहिती दिली.तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती कार्यवाह यांनी आपणही पद्यातील ओळीप्रमाणे पूजनीय हेडगेवार यांनी केलेल्या साधनेला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया व हे राष्ट्र परम वैभवापर्यंत नेण्यासाठी आपला हातभार लावावा असे म्हंटले.

या अभ्यास दौऱ्यात शालेय व्यवस्थापन मंडळ कार्यवाह श्री.केदारजी मंत्री माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.सुधाकर घायतडक,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सहभाग घेऊन दोन दिवसीय अभ्यास दौरा आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.