*अंबड प्रतिनिधी* गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील मौजे दोदडगाव शिवारात मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळताच आज दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे दोनच्या सुमारास तहसील कार्यालय अंबडच्या पथकाने तात्काळ कारवाई करून एक जेसीबी यंत्र ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार,महसूल पथक कारवाईसाठी शिवारात पोहोचत असल्याचे लक्षात येताच संबंधित जेसीबी चालकाने यंत्र पळवून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र सतर्क महसूल पथकाने तातडीने पाठलाग करून सदर जेसीबी थांबवण्यात यश मिळवले आणि त्यानंतर जेसीबी ताब्यात घेऊन तहसील कार्यालय,अंबड येथे जमा करण्यात आले.
ही कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी श्री. उमाकांत पारधी व मा.तहसीलदार श्री.विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत मंडळ अधिकारी सुखापुरी –विष्णू जायभाये,मंडळ अधिकारी वडीगोद्री–संदीप नरुटे,ग्राम महसूल अधिकारी–विशाल अनारूपे,योगेश गुरव,पवन तुपकर,श्याम विभुते तसेच महसूल सेवक–मनीष जिरेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अवैध उत्खनन थांबवण्यासाठी महसूल विभागाने घेतलेल्या या तत्पर कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक करण्यात येत असून पुढील तपास महसूल विभागामार्फत सुरू आहे.





Social Plugin