Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन साजरा



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय,पारनेर येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे सर होते.त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.शिक्षकांनीही आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेबांचे शैक्षणिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक गाढवे  सर म्हणाले,“समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारलेली भारताची घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी तळागाळातील व्यक्तींनाही राष्ट्रनिर्मितीचे सामर्थ्य दिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी.”

कार्यक्रमाला शिक्षक राजेश भापकर,विश्वनाथ पोटफोडे,दत्ता शेरे,बंडू मामा तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.