मंगेश पुंड @ग्रामीण प्रतिनिधी.
आज नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.या निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठा विजय झाला. हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष दादा बांगर यांच्या भावजय रेखाताई श्रीराम बांगर व भाजपकडून नीता बाबाराव बांगर व महाविकास आघाडीकडून अर्चना श्रीराम भिसे अशी लढत होती. यामध्ये आमदार संतोष दादा बांगर यांच्या भावजय रेखाताई श्रीराम बांगर हिंगोली नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या. आमदार संतोष दादा बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार आहेत, त्यांच्या भावजय रेखाताई श्रीराम बांगर ह्या विजयी झाल्या. रेखाताई बांगर यांच्या विरोधात भाजपने नीता बाबाराव बांगर यांना उमेदवारी दिली होती. रेखाताई बांगर यांच्या विरोधात हिंगोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेऊन देखील भाजपचा पराभव झाला व शिवसेनेच्या रेखाताई बांगर ह्या नगराध्यक्ष पदी विजयी तर 16 नगरसेवक विजयी झाले. आमदार संतोष बांगर यांनी विजयानंतर हा विजय माझ्या शिवसैनिकांचा,माझ्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली.
हिंगोली जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे अशा घोषणा देत त्यांनी आनंद व्यक्त केला. आमदार संतोष बांगर यांचे हिंगोली मध्ये नगराध्यक्षासह 16 नगरसेवक निवडून आले असून भाजप व महाविकास आघाडीचा पराभव झाला. आता हिंगोली जिल्ह्यावर आमदार संतोष दादा बांगर यांचे वर्चस्व राहणार असे चित्र आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभा घेऊन देखील भाजपचा पराभव झाल्यामुळे हा भाजपला मोठा धक्का आहे.





Social Plugin