बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट सातारा उद्योगपती दत्तात्रय जगताप यांनी श्री नागनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मधील आई वडील हयात नसणाऱ्या मुलींना शालेय साहित्य वाटप गोपूज या ठिकाणी देण्यात आले .त्याचे वितरण सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य , उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभयसिंह राजेघाटगे , प्राचार्य अंकुश भांगरे , पर्यवेक्षक नाना दडस , संजय माने, तानाजी पाटील, नवनाथ काळे, चंदा वाईकर यांच्या हस्ते शालेय दप्तर, वह्या, कंपास पेटी व 1831 रु चा चेक विद्यार्थिनींना देण्यात आले . यामध्ये पायल बालिश्राव शिरतोडे ,प्रतीक्षा धनाजी जाधव ,धनश्री ज्ञानेश्वर जाधव , सुप्रिया शामराव जाधव , जान्हवी रमेश खवळे , अमृता शंकर चव्हाण ,अक्षदा दत्तात्रय जाधव, आरोही दत्तात्रय गोडसे, शर्मिला श्यामराव जाधव ,जान्हवी ज्ञानेश्वर जाधव ,प्राजक्ता विशाल गोडसे या मुलींना हे साहित्य देण्यात आले .
यावेळी अभयसिंह राजेघाटगे विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांच्याकडून देखील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाते कोणाचेही शिक्षण परिस्थितीमुळे राहणार नाही यासाठी सहकार्य केले जाईल असे मनोगतात सांगितले .तसेच तानाजी पाटील सर यांनी दत्तात्रय जाधव उदयोगपती सामाजिक व शैक्षणिक करत असलेले कार्याबद्दल माहिती सांगितली .त्यांना देखील शालेय जीवनात मदत मिळाली होती आणि त्यामुळेच आपणही त्या कार्यात उतराई व्हावी या उदात्त हेतून ते विद्यार्थ्यांना मदत करत असतात तसेच त्यांच्या आरोग्याच्या समस्या यांच्या संदर्भात देखील सर्वतोपरी सहकार्य मदत केली जाईल असे महान कार्य करत असल्याबद्दल त्यांच्या संस्थेची माहिती दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी व आभार तानाजी पाटील यांनी मानले .विद्यालयाचे प्राचार्य भांगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींची माहिती सर्व वर्गशिक्षकांनी आशा फाउंडेशन पर्यंत पोहोचली व त्यांच्या सहकार्यातून ही मदत मिळाली आहे





Social Plugin