Ticker

6/recent/ticker-posts

मनस्वी खवळे हिने थांग ता मध्ये राष्ट्रीय ब्राँझ पदक पटकावले .



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर ,संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेली कुः मनस्वी दत्तात्रय खवळे या विद्यार्थिनी आसाम येथे 22 -24 डिसेंबर कालावधीत संपन्न झालेल्या थांग ता  स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदक मिळवले .याबद्दल सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभयसिंह राजेघाटगे यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले .तसेच विद्यालयाचे  प्राचार्य अंकुश भांगरे,प्राध्यापक शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी देखील मनस्वीचे अभिनंदन केले . बुधच्या  सरपंच सुजाता बोराटे ,पत्रकार प्रकाश राजेघाटगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ,माता पालक संघ सदस्य ,शिक्षक पालक संघ सदस्य , बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ यानींही मनस्वी खवळे चे अभिनंदन केले . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी तनुष्का चव्हाण या विद्यार्थिनीचा वाढदिवस  अभयसिंह राजेघाटगे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन तिलाही  शुभेच्छा दिल्या .

भगवान सरवदे यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले .