Ticker

6/recent/ticker-posts

सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ.



 प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

भोकरदन: तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत "बालाजी अभिनव सहकारी संस्था” यांच्या वतीने खरीप हंगाम २०२५-२६ साठी सुरु करण्यात आलेल्या हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ मा.आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. 

या सोयाबीन खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सोयाबीन हमीभावाने खरेदी केला जाणार असुन  खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

याप्रसंगी मदनशेठ कुलवाल, भगवान पाटील खाकरे, समाधान पाटील शेरकर, एकनाथराव काळे, सुभाष सपकाळ, भोलाने काका, अंबादास शेठ बावस्कर, रामूशेठ बावस्कर, विशाल महाले, डॉ. हेमंत सपकाळ, शालिकराम महाराज यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.