Ticker

6/recent/ticker-posts

- पुसेगाव - कला व वाणिज्य महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी उद्घाटन.




 रयत स्पर्धा परीक्षा अँकॅडमी हे ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे नवे व्यासपीठ... के.के.घाटगे.

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 रयत स्पर्धा परीक्षा अँकॅडमी हा उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक दिशा दर्शक ठरेल असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य के.के.घाटगे यांनी केले. 

 पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अँकॅडमी उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले ,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद.प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर,प्रा.डाॅ.ए.एस. जगताप प्रा.डॉ.एन.डी लोखंडे, प्रा.डॉ.एस. आर.धोंगडे, प्रा.डाॅ.एस.आर.शिंदे,प्रा.डाॅ.एच.जी. निमसे,प्रा.डाॅ.एम.एस.वाघ. प्रा.पी.व्ही.गायकवाड प्रा.श्रीमती.एम.बी.सोनार  प्रा.सौ. उज्वला मदने प्रा.ए.टी.खाडे श्री.किशोर शिंदे. इ.उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात श्री. घाटगे म्हणाले, "रयत स्पर्धा परीक्षा अँकॅडमी हा उपक्रम महाविद्यालयाच्या इतिहासात महत्त्वाची भर घालणारा आहे. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध विभागातील स्पर्धा परीक्षांचे वाढते क्षेत्र,उपलब्ध संधी, आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.ते म्हणाले,“आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास  केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य व केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवांत उत्तुंग यश मिळवू शकतात. रयत स्पर्धा परीक्षा अँकॅडमी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक मोठा शैक्षणिक आधारस्तंभ ठरेल. या उपक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना नमूद केले की, अकॅडमीमार्फत विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग, पोलीस भरती,

रेल्वे, तलाठी आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.तसेच नियमित सराव परीक्षा, दैनिक चालू घडामोडींचा अभ्यास, तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र, कार्यक्रमाचे 

आयोजनही सतत केले जाणार आहे.

अकॅडमीच्या वर्गांमध्ये इंट्रॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड, वाचनालय,  संदर्भ ग्रंथ परीक्षाचा अभ्यासक्रम ,इंटरनेट सुविधा यांसारख्या आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण सहज उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले,

"विद्यार्थ्यांना रयत स्पर्धा अँकॅडमी मुळे स्पर्धा परीक्षांबद्दलची धास्ती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल, अशी भावना व्यक्त केली. तसेच रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू झाल्यामुळे पुसेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवितील असा आत्मविश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुणे  यांचा परिचय प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर यांनी यांनी केला.तर सूत्रसंचालन प्रा.एस.आर.धोंगडे यांनी केले.आभार प्रा.डाॅ.ए.एस.जगताप यांनी मानले  कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.