
भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
ताज्या ताज्या भाज्यांनी भरलेला उमरेडचा हिवाळी भाजीबाजार विनय टाकीजसमोर सकाळपासूनच भाजीखरेडीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. हिवाळ्याची थंडी सुरू होताच उमरेड शहरात दरवर्षी एक वेगळीच गर्दी पहायला मिळते. शहरातील विनय टॉकीज समोर भरणारा हिवाळी भाजीबाजार ताज्याताज्या भाज्यांनी अक्षरशः भरून जातो.सकाळी ७ वाजताची या ठिकाणी भाजी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी जमू लागते.संपूर्ण परिसर शेतकरी तसेच नागरिकांनी गजबजून जातो. या बाजाराची खास वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत आणून विकतात. म्हणजेच कोणताही दलाल नसल्यामुळे शेतकऱ्याला योग्य दर मिळतो. तर ग्राहकाला ताजा गावरान माल वाजवी किंमतीत उपलब्ध होतो.शेतकरी भाजी उत्पादक तसेच ग्राहक असा रोखीने होणारा व्यवहार या हिवाळी बाजाराची ओळख बनलेला असून दररोज मोठी आर्थिक उलाढाल येथे होताना दिसून येते.
उमरेड शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात आलेल्या भाज्यांची बाजार रंगुन जातो. गावरान वांगी, टमाटर,गावरान मिरची,भिवपुरी मिरची,कोथिंबीर, तुळीच्या शेंगा, वालाच्या शेंगा,हिरवा कांदा,हिरवा लहसून,पालक, फुलगोभी, पत्तागोभि, गाजर, मुळा, बटाटे अशा नाना तऱ्हेच्या भाज्या येथे उपलब्ध असतात. या भाजीबाजारामुळे परिसरात पूरक व्यवसायाला चालना मिळते.यासोबतच फळांची दुकाने,चहा आणि नात्याच्या टपऱ्यामंडल्या जातात. हा बाजार केवळ खरेदीचे ठिकाण न राहता उमरेडकरांच्या जीवनशैलीचा एक भाग बनतो. एरवी नियमित भाजीबाजार इतवारी पेठेत व सोमवार बाजारात भरतो.मात्र हिवाळ्यात विनय टॉकीज जवळ भरणाऱ्या या खास बाजाराचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. ताजेपणा दलालयुक्त व्यवहार आणि शेतकारी आणि ग्राहकांपर्यंत थेट नाते यामुळे उमरेडचा हिवाळी बाजार शहराच्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहेत




Social Plugin