भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील।।
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील प्रकाश सांडु टोंपे या युवकांची भारतीय सिमा सुरक्षा रक्षक पदासाठी बी.एस.एफ.मध्ये निवड झाली आहे.गांवकरी आणि नातेवाईक मित्र मंडळाकडून प्रकाश ची ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत घ्या वतिने सत्कार करण्यात आला. प्रकाश घ्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची राहण्यासाठी घर नाही. भुमी हीन गरीबी पाचविलाच पुजलेली.
घरी आजी,आई, वडील लहान भाऊ, वडील रोज मजुरी करतात. प्रकाश ने रात्र दिवस मेहनत करून जिद आणि चिकाटच्या जोरावर.आर्मी, पोलिस,बी.एस.एफ.मध्ये भरती होण्याचा मनाशी निश्चय केला. आणि रात्रदिवसं मेहनत करुन ग्राउंड चाचणी पार केली . आणि अभ्यास करुन परीक्षा उत्तीर्ण केली.आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन आई वडिलांचे कष्टाचं चीज झाले.त्यामुळे प्रकाश चे नातेवाईक मित्र मंडळ गावकरी यांच्या कडुन अभिनंदन करण्यात येत आहे.ग्रामपंचायत कार्यालय सुरंगली तर्फे प्रकाश चां सत्कार करण्यात आला यावेळी संतोष काळे, ग्रामविकास अधिकारी संजय पाजगे, पत्रकार समद भाई ,रुबाब शेख, अनिल सोनवणे , यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील, सुभाष वर्पे यांनी प्रकाश टोंपे चे अभिनंदन केले आहे.





Social Plugin