विठ्ठल शिरसे यांची अध्यक्षपदी फेर निवड
.यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर
सध्याच्या सोशल मीडियाच्या वातावरणामुळे प्रिंट मिडियाला कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. कुठे जरा काही झाले की, सोशल मीडियावर त्या घटनेची त्रोटक माहिती दिली जाते. मात्र प्रिंट मिडियात सविस्तर माहिती दिली जात असल्याने आजही प्रिंट मिडियावरच मिळत असल्याने जनतेच्या विश्वासाला प्रिंट मिडिया पात्र असून पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नांशी निगडीत लेखन करावे, असे प्रतिपादन तिफनकार प्रा. डॉ. शिवाजी हुसे यांनी केले आहे.
कन्नड शहरातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात दर्पण दिनानिमित्त कन्नड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी सर्व पत्रकार बांधवांनी आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि कन्नड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश केवट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी वरिष्ठ पत्रकार राजानंद सुरडकर, मुक्त पत्रकार तथा सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.या वेळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
त्यात कार्याध्यक्ष - राजानंद सुरडकर, अध्यक्ष - विठ्ठल शिरसे, उपाध्यक्ष -अनिल शिरसाठ, आर. एस. पवार, सचिव - शेख इलियास, सहसचिव शेख आकिब, कोशाध्यक्ष - मुजीब खान, सदस्य - संजय काळे,अनिल गायकवाड, राजेंद्र नेवगे, अभिषेक देशमुख, किशोर क्षिरसागर, विशाल भालेराव, संतोष खाजेकर, सल्लागार - प्रा.डॉ. शिवाजी हुसे, संजय जाधव, संजय केवट आणि रविंद्र अजमेरा आदींचा समावेश आहे. संजय केवट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.





Social Plugin