Ticker

6/recent/ticker-posts

श्रमसंस्कार शिबिरातून सुसंस्कृत नागरिक घडतात.... के.के.घाटगे



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे] 

कष्टाची सवय, चांगले आदर्श व सुसंस्कृत जीवन मूल्ये यावरच माणसाची जडणघडण होत असते असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे  जनरल बॉडी सदस्य के.के. घाटगे यांनी केले . पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच महेश नलवडे होते .महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले , प्रा. डॉ.अनिल जगताप ,सरपंच  सुधाकर देवकर, उपसरपंच श्री.महेश नलवडे, श्री.संजय नलवडे, श्री.अनिल नलवडे, श्री.रवींद्र नलवडे ,कॅप्टन गुंजवटे , श्री.श्रीमंत गायकवाड, श्री .गजानन धुमाळ, श्री .जितेंद्र नलवडे,   श्री .मधुकर नलवडे, श्री .अमोल नलवडे, श्री .नामदेव मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे घाटगे म्हणाले,"तसेच विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार, कष्टाची सवय, सामाजिक जबाबदारी आणि सुसंस्कृत जीवनमूल्ये याबाबत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले श्रमाला प्रतिष्ठा देणे हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे खरे उद्दिष्ट आहे. आजच्या युगात भौतिक सुख-सोयी वाढत असताना कष्टाची सवय कमी होत चालली आहे. मात्र श्रमसंस्कार जोपासल्यास व्यक्तिमत्त्व मजबूत होते. आणि जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो. “स्वतःच्या श्रमातून केलेले काम माणसाला आत्मसन्मान शिकवते या ची माहिती सांगताना संत गाडगेबाबा आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे श्रम प्रतिष्ठा , स्वावलंबी शिक्षण या विषयाचे माहिती विद्यार्थ्यांना  सांगितली तसेच चांगले आदर्श अंगीकारणे ही काळाची गरज आहे. महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य व त्याग यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे. केवळ शिक्षण घेणे पुरेसे नसून, समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये हीच जाणीव जागृत करते.तसेच श्री.संजय नलवडे म्हणाले," संस्कार हे सुसंस्कृत जीवनशैलीवर आधारित असते.  व सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर संस्कारांची बीजे तरुणांच्या मनात रुजवावी लागतात. शिस्त, वेळेचे पालन, स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सामाजिक ऐक्य आणि सहकार्य या मूल्यांचा अंगीकार केल्यास विद्यार्थी खऱ्या अर्थाने समाजाचे सक्षम नागरिक बनू शकतात.असा आत्मविश्वास व्यक्त केला. पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदिप पोमण शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, 'स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनले पाहिजे.उच्च शिक्षण घेऊन आदर्श व्यक्तिमत्व बनविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी श्रमदान,स्वच्छता , आरोग्य,अभियान,जनजागृती उपक्रम, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक समस्या समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात सेवा भाव निर्माण होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी ते सज्ज होतील,असा विश्वासही व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत वेटणे उपसरपंच श्री. महेश नलवडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा तसेच रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा. डॉ.संजय क्षीरसागर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये स्वीकारली पाहिजे, जबाबदारी ओळखली पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समाजाने अनेक संधी दिली आहे. त्यामुळे त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो  ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ  मिळविणे एवढाच नसून समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे संवेदनशील व जबाबदार नागरिक घडविणे हा आहे.असे त्यांनी सांगितले. तसेच  त्यांनी  पदवी बरोबर विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य प्राप्त केली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. पुढील दिवसात विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जाणार आहेत. याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.जी. कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.आर.धोंगडे यांनी केले. तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.एच.जी.निमसे यांनी मानले कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील  सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक ,वेटणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 छायाचित्र - वेटणे - राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरांचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना.के.के.घाटगे,संजय नलवडे, सरपंच श्री.सुधाकर देवकर, श्री.महेश नलवडे, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,इतर सर्व मान्यवर छाया - प्रकाश राजेघाटगे बुध