Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा



बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ]  

.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उत्साहाने श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुधमध्ये साजरा करण्यात आला . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे , प्राध्यापक शिक्षक - शिक्षीका -शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी केली .यावेळी विद्यालयातील शिक्षिका सौ चंदा वाईकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सावित्रीबाईंचे विचार मांडले .विद्यालयातील बालिका यांनी विविध कर्तबगार महिलांचे वेशभूषा करून त्यांचे सामाजिक कार्य एक पात्री नाटकातून सादरीकरण केले . रिया जगदाळे -सावित्रीबाई फुले ,आरोही गोडसे - राष्ट्रमाता जिजाऊ  ,निर्भीय जाधव - इंदिरा गांधी  ,स्वरांजली जाधव -राष्ट्रमाता जिजाऊ ,अक्षता जाधव -ताराराणी ,तसेच अर्णव फुरकुटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणात सांगितला .विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर महर्षी धोंडो कर्वे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य याविषयी मनोगत सांगितले .तसेच सानिका बुधवले मॅडम यांनी देखील सावित्रीबाईं शैक्षणिक आढावा सांगितला .अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांनी अनिष्ट रूढी, परंपरा ,सती चाल विधवा केशवापण, चालीरीती याविषयी आपले विचार मांडले . तसेच सामाजिक व शैक्षणिक जीवनामध्ये फुले दांपत्य यांनी दिलेले योगदान कायमस्वरूपी महिलांच्या जीवनात प्रकाश देऊन गेला व कायमचा अंधार त्यांचा नष्ट केला असे महान कार्य केले आहे . सामाजिक जीवनात मोठ्या प्रमाणात प्लेग ची साथ पसरली असताना देखील स्वतः प्लेग लोकांची  सेवा केली .व त्यातच त्यांना लागन झाली .विधवा महिलेचा मुलगा दत्तक घेऊन त्यास डॉक्टर केले . व तोही समाजाची सेवा करू लागला याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले .बालिका दिनाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खूप छान पर्णवी जगदाळे व आयुष्य सातपुते 7वी ब यांनी केले . कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील शिक्षक भगवान सरवदे यांनी मानले व विद्यालयातील सर्व मुलींना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक उपस्थित होते .