वैभव सोळंके/तालुका प्रतिनीधी 

5 जानेवारी/ माजलगाव

सादोळा ता.माजलगाव येथे कार्यरत असलेले गोविंद गोचडे यांनी चनई आपल्या गावी(ता. अंबाजोगाई) येथील जिल्हा परिषद 

प्राथमिक शाळा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पुस्तक असे शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित श्री.कमलाकर गोचडे यांनी प्रास्ताविक केले, श्री.सुरेश कदम यांनी श्री गोविंद गोचडे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती गोचडे यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला , सदरील कार्यक्रमध्ये उपस्थित श्री वाल्मीक लगसकर,श्री बिभीषण फुके, श्री राहुल गोचडे, श्री.मुस्तफा शेख, श्री.सुभाष गोचडे, श्री.रंगनाथ काळे, अंगणवाडी ताई, आशाताई , आदि मान्यवर उपस्थित होते